Majhi Tujhi Reshimgath Myra Vaikul Fan | चिमुरड्या मायराची ही 'जबरा फॅन' | Lokmat Filmy

2021-09-04 6

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळतेय. या मालिकेने अवघ्या एका आठवड्यातचं टीआरपीच्या लिस्टमध्ये अव्वल स्थान मिळवलयं. या मालिकेतून प्रेक्षकांची मन जिंकून घेणारी चिमुरडी म्हणजेच बालकलाकार मायरा वायकुळ. अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे या दोन प्रसिद्ध कलाकारांसोबतच क्युट मायरा चांगलीच भाव खाऊन जातेय. तिच्या क्युटनेसवर चाहते फिदा झालेत. छोट्या पडद्यावर झळकण्याआधीच मायरा सोशल मिडियावर प्रचंड लोकप्रिय होती. मालिकेतील परिच्या भूमिकेने तिला आणखीच लोकप्रियता मिळाली. तिचा चाहता वर्ग आणखीच वाढला आहे. नुकतेच मायराच्या एका फॅनने तिच्य़ावर एक कविता बनवली आहे. त्याचा एक व्हिडीओ मायराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलाय. यामध्ये मायराचे वडिल तिच्या फॅनने बनवलेल्या या कवितेबद्दल सांगताना दिसून येतायेत. याशिवाय तिची चाहती प्रतिक्षा हिने देखील तिच्या इन्स्टाग्रामवर ही कविता शेअर केली आहे.
snehal vo
#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #MyraVaikul #MajhiTujhiReshimgath #ShreyasTalpade #Prarthanabehere
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber